जळगाव,(प्रतिनिधी)- गावठी पिस्तोल बाळगणारी अंतर जिल्हा टोळीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 14 रोजी जेलबंद केले.दरम्यान आरोपीनी वाहनाच्या पायदान खाली ०४ गावठी पिस्तोल, व दोन्ही आरोपीतांच्या पॅन्टच्या खिश्यात प्रत्येकी ०५ जिवंत काडतुस मिळून आलेले आहेत.
सविस्तर असे की,जळगाव जिल्हयांत अग्निशस्त्र बाळगणान्यावर कारवाई करण्याबाबत एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक जळगाव, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, ऋषिकेश राऊले, सहा. पोलीस अधीक्षक, चोपडा उपविभाग, चोपडा यांनी किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना त्याप्रमाणे सुचना व मार्गदर्शन केले.
किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दि. १३/११/२०२२ रोजी गुप्त बातमीदार बातमी मिळाली की, शिर्डी जि.अहमदनगर येथील काही इसम हे उमटी (मध्यप्रदेश) येथे गावठी पिस्तोल व जिवंत काडतुस विकत घेण्यासाठी हुंडाई कंपनीची व्हर्ना पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी तिच्या मागच्या नंबर प्लेटवर अध्यक्ष टायगर ग्रुप श्रीरामपुर असे असुन क्र. MIH-१५ / DM७७७८ अशा गाडीने आलेले आहेत. ते चोपडा कडून शिर्डी जि. अहमदनगर येथे जाणार आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाली आहे.
त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलोस अंमलदार पोउनि, अमोल देवढे, पोहेकॉ / सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ महेश आत्माराम महाजन, पोना/ रविंद्र रमेश पाटील, पोना / परेश प्रकाश महाजन, पोकों/दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोकों/मुरलीधर सखाराम बारी यांचे पथक तयार करुन त्यांना मिळालेली गुप्त बातमी प्रमाणे चोपडा शहरात शिवाजी चौकात उमटी कडून येणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून संशयीत वाहने चेक करीत असतांना २३.०५ वा. वरील संशयीत चारचाकी गाडी क्र.MH-१५/DM७७७८ ही आल्यावर पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर वाहनास घेरून सदर गाडीतील दोन इसमांना पकडून त्यांची चारचाकी हुंडाई कंपनीची व्हर्ना क्र. MII १५DM७७७८ गाडीची झडती घेतली असता सदर वाहनाच्या पायदान खाली ०४ गावठी पिस्तोल, व दोन्ही आरोपीतांच्या पॅन्टच्या खिश्यात प्रत्येकी ०५ जिवंत काडतुस मिळून आलेले आहेत. सदर आरोपी १) राजेंद्र ऊर्फ पणू भिमा चव्हाण वय ३२ मुळ रा. खंडाळा ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर, ह.मु.वार्ड क्र. ३ श्रीरामपुर जि. अहमदनगर, २) गणेश ज्ञानेश्वर सातपुते वय २३ रा. शिरसगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर यांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांचे कडून ०४ गावठी पिस्तोल, १० जिवंत काडतुस ०३ मोबाईल हॅण्डसेट, ०१ हुंडाई कंपनीची व्हनां क्र. MH १५/DM७७७८ चारचाकी वाहन असे एकूण ८,०८,३००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
यातील आरोपी १) राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण वय ३२ मुळ रा. खंडाळा ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर, ह.मु. वार्ड क्र. ३ श्रीरामपुर जि. अहमदनगर याचेवर अहमदनगर जिल्हयांत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून बरेच गुन्हे दाखल असल्याचे समजुन आले आहे. सदर कारवाई संदर्भात चोपडा शहर पो.स्टे. CCTNS नं. ४५९ / २०२२ भारतीय हत्यार कायदा क. ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पथकाने जिल्हयां बाहेरील टोळी पकडून चांगली कामगिरी केलेली आहे.