नवी दिल्ली-देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार आहेत. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यूआयडीएआय ने देशभरातील आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही केंद्रे दर मंगळवारी बंद असायची.
यूआयडीएआय’नं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ‘यूआयडीएआय’द्वारे सुरू केलेली आधार सेवा केंद्रे आता सातही दिवस खुली राहतील. दररोज १००० आधार एनरॉलमेंट किंवा रिक्वेस्ट अपडेट करण्याची या आधार सेवा केंद्रांची क्षमता आहे.
आधार सेवा केंद्रांवर कोणत्या सुविधा मिळतील?
पासपोर्ट सेवा केंद्रांच्या धर्तीवर सुरू केलेल्या आधार सेवा केंद्रांवर जाण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊ शकता. आधार केंद्रात नव्या आधार कार्डसाठी अर्ज किंवा एनरॉल करण्यासह तुम्ही यूआयडीएआय डेटाबेसमध्ये नावे, पत्ता, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, जन्मतारीख, लिंग अथवा बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट किंवा आयरिस) बदलून घेऊ शकता.