सांगली,(प्रतिनिधी) – ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावर अपघात झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून अभिनेत्रीच्या वाहनाला डंपरने धडक दिल्याने मोठा अपघात झाला आणि त्यात या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाला. कल्याणी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती.’तुझ्यात जीव रंगला‘ या मालिकेत तिने अभिनयाचा ठसा उमटवत मोठी प्रसिद्धी मिळवली होती.तिच्या मृत्यूनंतर मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. यामुळे तिला घराघरात ओळख मिळाली. त्याबरोबर तिने सन मराठी या वाहिनीवरील दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.