जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील रामदास कॉलनी येथील मनोकल्प कंपनीच्या कार्यालयात बळजबरीने प्रवेश करून लॅपटॉप, प्रिंटर, संगणक, सोने-चांदीचे शिक्के, लाकडी कपाट आणि रोकड असा एकूण १ लाख १४ हजार रूपयांचा ऐवज जबरीने वाहनात भरून घेऊन गेल्याप्रकरणी जितेंद्र उर्फ रवी देशमुख, विनोद देशमुख यांच्यासह ११ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारी रामानंदनगर पोलिसांनी जितेंद्र उर्प रवी देशमुख (४९, रा. अयोध्यानगर), रितेश पाटील (४२, रा. ख्यॉजमिया चौक) व कैलास पाटील (५१. रा. पिंप्राळा) यांना अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले होते. तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.