नागपूर: राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाच्या शिवसेनाला एकापाठोपाठ धक्के बसत आहे. अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशातच आता ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे विदर्भातील जिल्हाप्रमुख ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात येणार आहेत. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा दावा केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे येत्या हिवाळी अधिवेशनातच ठाकरे गट फुटणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
विदर्भातील ठाकरे गटाचे सर्वच पदाधिकारी शिंदे गटात येणार आहेत. या शिवाय विदर्भातील ठाकरे गटाचे 8 जिल्हाप्रमुखही शिंदे गटात येणार आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.
हे पण वाचाच..
लग्नानंतर शून्य रिस्कवर उघडा ‘हे’ खाते! दरमहा मिळतील 4950 रुपये, काय आहे ही योजना?
तरुण ग्रामपंचायत सदस्यांने शेतातील झाडाला घेतला गळफास ; जळगाव तालुक्यातील घटना
आजपासून बदलेल ‘या’ राशींचे भाग्य, शुक्राचे संक्रमण देणार छप्परफाड पैसा
तुमाने यांनी काँग्रेसचे माजी आमदारही शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसचे कोणते माजी आमदार शिंदे गटात येणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे काँग्रेसमध्येही मोठी फूट पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, तुमाने यांनी विदर्भातील कोणते 8 जिल्हाप्रमुख येणार याची माहिती दिली नाही. त्यामुळे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणारे ते जिल्हाप्रमुख कोण? याची कुतुहूलता सर्वांनाच लागली आहे. तसेच काँग्रेसचे कोणते माजी आमदार शिंदे गटात येणार याची उत्सुकताही ताणली गेली आहे.