एरंडोल- गांधीपुरा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पीतांबर मराठे व व्हाइस चेअरमन बुधा चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर चेअरमनपदी दशरथ पांडुरंग चौधरी यांची निवड करण्यात आली. त्यांना सूचक म्हणून वामन महारु मराठे तर अनुमोदक म्हणून प्रताप फकिरा चौधरी यांनी सहकार्य केले. तर व्हाइस चेअरमन पदासाठी सुमनबाई वसंत पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. डी. पाटील यांनी काम पाहिले. चेअरमन दशरथ चौधरी यांच्या पत्नी नगरसेविका सुरेखा चौधरी यांनी औक्षण करून काैतुक केले. प्रमोद बडगुजर, बुधा चव्हाण, माजी नगरसेवक सुनील चौधरी, नाना बडगुजर, दत्तू चौधरी, कैलास वंजारी, संजय पाटील व सोसायटीचे सर्व सभासद व संचालकांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाइस चेअरमन यांचे काैतुक केले अाहे.