मुंबई : राज्यात शिंदे- फडणवीस सरकारडून काही दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनतर लगेचच काही तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरतो पोस्टपोन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र आता राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिंदे- फडणवीस सरकारने पोलीस भरतीमधील वयोमर्यादेचा तांत्रिक अडथळा दूर करून सरकारने पोलीस भरतीचा मार्ग मोकळा केला आहे.
या ठिकाणी भरल्या जाणार जागा
मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244, लोहमार्ग पुणे – 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण – 14956
कोणत्या प्रवर्गाला किती जागा?
अनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) – 426, भटक्या जमाती (ब) – 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) – 292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग – 2926 इडब्लूएस – 1544, खुला – 5468 जागा, एकूण – 1495