मुंबई,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज सोमवार रोजी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यकर्ते रुग्णालयाच्या परिसरात जमण्याची शक्यता आहे.हे लक्षात घेऊन पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एक पत्रक जारी करत कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
तीन दिवस रुग्णालयात राहणार दाखल
शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत.दि.2 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल व ते 3 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या 4 व 5 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वाना मार्गदर्शन करणार आहेत.पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करू नये’, असे आवाहन करण्यात येत आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील तीन दिवस पवार साहेबांना मुंबईतील ब्रीज कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. #NCP pic.twitter.com/YpjqjcFw1E
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 31, 2022