पुष्पा चित्रपटात ‘ओ अंतावा’ (Oo Antava) गाण्याने मोठी प्रसिद्धी मिळालेली साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकतेच सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टने तीच्या चाहत्यांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला.तिला झालेल्या आजाराची माहिती या पोस्टमधून जाहीररित्या सांगितलं आहे.‘मायोसिटिस’ या दुर्मिळ आजाराने समंथाला ग्रासलं आहे. या ऑटोइम्युन हेल्थ कंडिशनवर मात करण्यासाठी समंथा सध्या परदेशी उपचार घेत आहे. अनेकांनी तर या आजाराचे नावं पहिल्यांदाच ऐकलं आहे. त्यामुळे आजार नेमका काय आहे यामुळे चाहते चिंतीत आहेत. तर mजाणून घेऊयात की नेमका आजार काय आहे आणि त्याचे लक्षणं काय आहेत.
मायोसिटिस म्हणजे काय?
मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ. याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ. सुधा मेनन यांनी दिली.
या आजारामध्ये सहसा हात, खांदे, पाय, पार्श्वभाग, पोट आणि पाठीच्या स्नायूंवर परिणाम होतो. आजार आणखी बळावला असेल तर त्याचा अन्ननलिका, डायफ्राम आणि डोळ्यांच्या स्नायूंवरदेखील परिणाम होऊ शकतो. अशा रुग्णांना बसल्यानंतर उभं राहताना, पायऱ्या चढताना, वस्तू उचलतानाही सहत्रा त्रास होतो.
मायोसिटिसची लक्षणं कोणती?
“मायोसिटिसमध्ये सर्वसामान्यपणे स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवतात. स्नायूंचं दुखणं आणि दैनंदिन जीवनातील कामं करण्यात अडचण अशी लक्षणं असतात. हलका ताप, पुरळ आणि सांधेदुखी ही सुद्धा सामान्य लक्षणं असू शकतात.
— Samantha (@Samanthaprabhu2) October 29, 2022