पुणे : माणुसकीला काळीमा फासणारी एक दुर्दैवी घटना समोर आलीय. अवघ्या 13 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीय. ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
देशासह राज्यात महिलांवरील बलात्कारांच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच आता तान्हुल्या मुली देखील असुरक्षित असल्याची भिती निर्माण करणारी घटना घडली आहे. फक्त 13 महिन्याच्या लैंगिक अत्याचार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.
वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ओळखीतल्या व्यक्तीनेच हे दुष्कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हे सुद्धा वाचा..
प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! रेल्वेने आज रद्द केल्या तब्बल 169 गाड्या
धक्कादायक ;दिवाळीच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने दोन वायरमनचा मृत्यू
फटाके फोडण्यावरून वाद : २१ वर्षीय तरुणाचा तिघांनी केला खून
10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी.. येथे सुरूय 1500 हून अधिक पदांवर बंपर भरती
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी घरी जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका डिलीव्हरी बॉयने तरुणीला किस केला होता. तर, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.