जळगाव,(भूषण पाटील)- भारताचा पाकिस्तानावर “विराट” विजय मिळवत भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट प्रेमीना मोठं दिवाळी गिफ्ट दिलं आहे. भारताने विजय मिळवताच देशात अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी झाली.विश्वचषकाचा भारताचा पहिला सामना पाकिस्तान च्या सोबत मेलबर्नमध्ये झाला. शेवटच्या चेंडु पर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखुन धुव्वा उडवला.
भारताने वर्ल्ड कप ची सुरवात पाकिस्तान ला नमवुन जोरदार केली आहे. विराट कोहलीने ५३ चेंडुत ८३ धावा केल्या. पाकिस्तान च्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरवात खराब झाली. भारताचे सलामीवीर रोहीत शर्मा आणि केएल राहुल यांनी खराब सुरवात झाली.दोन्ही सलामीवीर ४-४ धावा करुन तंबुत परतले.नसीम शहाने केएल राहुल ची तर हारिस रऊफ ने कर्णधार रोहीत शर्मा ची विकेट घेतली.
रोहीत – राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सुर्य कुमार यादव ने पहिल्याच चेंडु वर चौकार मारत दमदार सुरवात केली पण मात्र हारिस रऊफ च्या वेगाने त्याला चकवले आणि सुर्या १० चेंडुत १५ धावा करुन बाद झाला. भारतीय संघाकडुन फलंदाजी करताना विराट कोहली ने ५३ चेंडुत नाबाद ८३ धावा कुटल्या.आणि हार्दिक ने ३ विकेट घेतले ३०/३, त्याच्या व्यतिरिक्त हार्दिक पंड्या यानेही ४० धावांचे योगदान दिले. व सामनावीर विराट कोहली ठरला.