फारुखाबाद : यूपीच्या फारुखाबादमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्येत प्रेयसी सोबत रुग्णालयात इलाजासाठी गेलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर प्रेयसी आणि पत्नीमध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी पहायला मिळाली. या प्रकारचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे 28 सेकंदाचा व्हायरल झालेला व्हिडिओ फर्रुखाबादच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचा आहे. 20 ऑक्टोबर रोजी एक व्यक्ती आपल्या प्रेयसी उपचारासाठी आला होता. हा प्रकार त्यांच्या पत्नीला समजताच तीही घटनास्थळी पोहोचली. तिथे पतीला प्रेयसीसोबत पाहून तिला राग आला.
फर्रुखाबाद:दो विवाह करना खतरनाक साबित हो सकता है।
जिला अस्पताल में पति को देखने पहुंचीं दोनों पत्नियों में हो गई लड़ाई।
पति ने दोनों पत्नियों को सरेआम चप्पल से पीटा।#वहुविवाह pic.twitter.com/F6sePbAmj0— Himanshu Dwivedi(Journalist)???????? (@Dwivedihd92) October 22, 2022
हाणामारी पाहून बघ्यांची गर्दी जमली
यानंतर सुरू झालेल्या बाचाबाचीने हाणामारीचे रूप धारण केले. दोन्ही महिलांनी रुग्णालयाच्या आवारातच मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन महिलांमधील भांडण पाहून एकच गर्दी जमली. त्यानंतर महिलेचा पतीही तेथे आला आणि दोघांना वेगळे करण्याचा अनेक प्रयत्न केला, मात्र महिला एकमेकांना मारहाण करत राहिल्या.
दोन्ही महिलांना चप्पलने मारहाण केली
हे पाहून पतीने चप्पल काढून दोन्ही महिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतर महिला विभक्त झाल्या. यानंतर हा व्यक्ती पत्नीसह घटनास्थळावरून निघून गेला. त्याचवेळी त्याची मैत्रीणही रुग्णालयातून निघून गेली. तेथे उपस्थित असलेल्या काही व्यक्तीने या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. जो वेगाने व्हायरल होत आहे.