अलवर : देशात महिलासंह मुलींवर होणारे अत्याचारा च्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच आहे. अशातच एक बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. राजस्थानमधील अलवरमध्ये ही घटना घडलीय. येथे एका बापाने आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
रात्रीच्या वेळी आईने नऊ वर्षांच्या मुलीला वडिलांकडे झोपायला पाठवले तेव्हा त्याने रेप केला. मुलीला रक्तस्राव झाला, तिची प्रकृती एवढी बिघडली होती की तिच्या प्रायव्हेट पार्टला टाके घालावे लागले. सर्व काही माहीत असूनही घरातील सदस्य या नराधमाचा बचाव करत राहिले. सर्वांनीच मौन पाळले होते. ही घटना बेहरोर पोलिसांत नोंद झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर वडिलांनी तिला एका क्वेकरी डॉक्टरकडे नेले होते, जिथे तिच्या प्रायव्हेट पार्टला टाके घालण्यात आले होते. मुलगी सध्या चाइल्डलाइन टीमसोबत आहे, जिथे तिचे समुपदेशन केले जात आहे.
हे सुद्धा वाचा..
गेल्या वर्षीपेक्षा जळगाव सुवर्णनगरी सोन्याचा भाव इतक्या रुपायांनी स्वस्त
तरुणांसाठी खुशखबर..PM मोदींनी केला रोजगार वेळाव्याचं शुभारंभ, 75000 तरुणांना मिळणार नियुक्ती पत्र
मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी खुशखबर.. आता ‘हे’ सामानही मिळणार मोफत!
मंत्री झाला म्हणून.. आ. चिमणराव पाटलांनी मंत्री गुलाबराव पाटलांना खडेबोल सुनावले
वडिलांकडून अत्याचार झालेली मुलगी चौथीत शिकत असल्याचे सांगण्यात येत आहे. तो फक्त नऊ वर्षांची आहे. अनेक दिवसांपासून तिचे वडील तिला त्रास देत होते. चौकशीत आरोपीचे कुटुंब आणि त्याचे भाऊ एकाच ठिकाणी राहत असल्याचे समोर आले आहे. त्यांचे दोन खोल्यांचे घर आहे. घराच्या मागील बाजूस असलेल्या गोठ्यात आरोपी त्याची पत्नी, नऊ वर्षांची मुलगी, चार आणि सहा वर्षांच्या दोन मुलांसोबत झोपत असे. घटनेच्या रात्री आईने मुलीला वडिलांकडे झोपायला पाठवले आणि काम संपवून दोन्ही मुलांना सोबत घेऊन येत असल्याचे सांगितले.