नवी दिल्ली : या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या दरात झालेली घट ही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. आज धनत्रयोदशीच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने खरेदी करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
भारतीय सराफा बाजारात या आठवड्यात सोन्याचा भाव ५० हजार रुपयांच्या खाली आला आहे. या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव ४९,८८५ रुपयांवर बंद झाला. या आठवड्यात दोन दिवस वगळता उर्वरित तीन दिवस सोन्याच्या दरात घसरण होती.
या आठवड्यात सोन्याचे भाव
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 50,763 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. सोमवारी, या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सोन्याचे भाव घसरले आणि 50,315 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. त्यात मंगळवारी किरकोळ वाढ झाली. बुधवारी भाव ५०,१३५ पर्यंत घसरले. गुरुवारी, किमती 50,247 वर चढल्या. मात्र शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि तो 49,855 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. सर्व प्रकारच्या सोन्याचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावर GST चार्जेस वेगळे भरावे लागतात.त्यामुळे दागिन्यांच्या किमती वाढतात.
हे सुद्धा वाचा..
आज धनत्रयोदशीला ‘या’ तीन राशींचे नशीब चमकेल
राज्यात लवकरच 10 हजाराहून अधिक पदांसाठी मेगाभरती; मंत्री महाजनांची माहिती
दिवाळीत मुलीच्या भविष्यासाठी ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करा.. 21 वर्षांनंतर खात्यात येतील 65 लाख
राज्यातील प्रमुख शहरातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,४५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६१ रुपये आहे. जळगावमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,३०० रुपये इतका आहे. तर चांदीचा दर ५६,७०० रुपये इतका आहे.