मुंबई : आरोग्य विभागात नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे, अशी माहिती मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिली आहे.
या पदांसाठी होणार भरती :
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. अशी माहितीही मंत्री महाजन यांनी दिली. तसेच या पदभरती संदर्भातील ऑफिशिअल नोटिफिकेशन लवकरच जरी करण्यात येणार आहे अशीही माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रचंड घोटाळा झाल्याची माहिती समोर आली होती. काही ठिकाणी परीक्षाही रद्द कराव्या लागल्या होत्या. गैरव्यवहार झाला होता. मात्र यंदाही तसंच काही होऊ नये असं उमेदवाराचं म्हणणं आहे.
हे सुद्धा वाचा..
दूध, अंडी टाळा! शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला मिळतील अनेक फायदे
आजपासून बसचा प्रवास महागला; वाचा किती रुपयांची झाली वाढ
बकालेंना औरंगाबाद खंडपीठाचाही झटका ; अटकपूर्व जामीन फेटाळला
या पदभरती संदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा
पदभरतीच्या एकूण जागा – 10,127
परीक्षांची तारीख – 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
निकाल जाहीर होण्याचा कालावधी -27 मार्च ते 27 एप्रिल 2023