मुंबई : ऐन दिवाळीत एसटी बसचा प्रवास महागला आहे. काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाने गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी प्रवासासाठी १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत कायम राहणार
सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. एसटी महामंडळाकडून साधारणपणे ५ ते ७५ रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार आहे.
दरम्यान, दिवाळीसाठी अनेक जण आपल्या गावी जातात. त्यासाठी ते आधीच तिकीट करून ठेवतात. अशातच ज्या प्रवाशांनी जुन्या तिकीट दरानुसार बसचे आरक्षण केले असेल व ते प्रवासी जर 10 टक्के दरवाढीदरम्यान प्रवास करत असतील तर अशा प्रवाशांकडून बुकिंग केलेल्या तिकीट व्यतिरिक्त वाढीव तिकिटाचे पैसे वसूल करण्यात येतील.
हे सुद्धा वाचा..
बकालेंना औरंगाबाद खंडपीठाचाही झटका ; अटकपूर्व जामीन फेटाळला
उद्यापासून बँकांना तब्बल ‘इतके’ दिवस सुट्ट्या ; बँकेची कामे आजचं आपटून घ्या..
पोरांनो तयारीला लागा! 75 हजार रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा
आजचे राशीभविष्य : तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या
तथापी, ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.