जळगाव । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना खंडपीठानेही झटका दिला आहे. तो म्हणजे बकाले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळून लावला आहे. यापूर्वी जळगाव जिल्हा न्यायालयानेही बकालेचा अर्ज फेटाळून लावला होता.
किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर आज औरंगाबाद न्यायालयाने बकालेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
हे सुद्धा वाचा..
उद्यापासून बँकांना तब्बल ‘इतके’ दिवस सुट्ट्या ; बँकेची कामे आजचं आपटून घ्या..
पोरांनो तयारीला लागा! 75 हजार रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा
आजचे राशीभविष्य : तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या
फेसबुकवर मैत्री, मैत्रीतून प्रेम आणि मग लग्न ; पण लग्नानंतर मुलीसोबत घडला धक्कादायक प्रकार..
याआधी जळगाव जिल्हा न्यायालयानेही बकालेचा अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडून काढून तो होम डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनी बकाले यांच्या शोधार्थ तीन पथकांची नेमणूक केली होती. यातील दोन पथके नुकतीच रिकाम्या हाती नुकतेच परत आले आहेत.