भुसावळ : ऐन सणासुदीच्या तोंडावर तांत्रिक कारणामुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. मध्य रेल्वेने बुधवार नंतर आज गुरूवारी (दि. २०) अनेक गाड्या रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेससह अन्य १० गाड्या रद्द केल्या आहेत.मनमाड-दौंड सेक्शनमध्ये ब्लॉक घेतल्याने रेल्वे प्रशासनाने १० गाड्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, रद्द झालेल्या गाड्यांमध्ये दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस १९ व २० ऑक्टोबर , साईनगर-दादर एक्स्प्रेस १९ व २० ऑक्टोबर तसेच पुढील गाड्या बुधवार, गुरुवारी रद्द केल्या आहेत.
हे सुद्धा वाचा..
अरे बापरे.. जळगावचा डॉक्टर अडकला हनी ट्रॅपमध्ये, व्हिडिओ बनवून मागितली ७ लाखाची खंडणी
पुन्हा निर्भया कांड : 2 दिवस 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला रॉड
अहो आंटी, सोडा.. मुंबई लोकलमधील महिलांच्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
उत्तर महाराष्ट्रात भाजपला धक्का ; ‘या’ माजी आमदाराचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
यात पुणे-निजामाबाद (१९), निजामाबाद-पुणे (१९ व २०), गाेंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस (१९ व २०), भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस दाेन्ही बाजूने दि. २० रोजी रद्द केली आहे. पुणे-नागपूर (२२१४१) ही गाडी गुरूवारी (दि.२०) दाेन्ही मार्गावर रद्द आहे. पुणे-अजनी एक्स्प्रेस शुक्रवारी (दि.२१) रद्द केली आहे.