धुळे : उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार आहे. कारण ठाकरे गटाच्या शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी मातोश्री येथे शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला एक नवीन दमदार चेहरा मिळाल्याने शिवसैनिकांचे मनोबल वाढणार आहे. राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका जिल्हा बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून सत्ता होती.
यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने निश्चितपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना अधिकचे बळ मिळणार आहे.