मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी, धनत्रयोदशीसारखा सण येऊन ठेपला आहे. अशातच सणांची तयारी करणाऱ्या ग्राहकांना लवकरच महागाईचा आणखी एक झटका बसू शकतो. कारण देशांतर्गत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार पाम तेलावरील आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहे. यानंतर खाद्यतेलाच्या किमती वाढू शकतात.
दरम्यान, परदेशातील बाजारातून मिळालेल्या संकेतांमुळे तसेच सणांच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे आजच्या किमतीत वाढ झाली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते परदेशातील बाजारातील मजबूत कल आणि वाढती मागणी यामुळे मंगळवारी दिल्ली तेल तेलबिया बाजारात जवळपास सर्व खाद्यतेलाच्या किमतीत सुधारणा दिसून आली. व्यापाऱ्यांनी सांगितले की, दिवाळीचा सण जवळ आल्याने खाद्यतेलाची मागणी वाढली आहे, त्यामुळे बहुतांश खाद्यतेलाचे भाव वाढीसह बंद झाले आहेत.
किती वाढल्या किमती
मोहरी तेलबिया आज ७०० रुपये प्रति क्विंटल, भुईमूग ७२१० रुपये प्रति क्विंटल, सरसों पक्की घाणी २३६० रुपये प्रति टिन, सरसों कच्ची घाणी २४१५ रुपये प्रति टिन, सीपीओ एक्स कांडला ८६०० रुपये प्रति क्विंटल, पामोलीन २००० रुपये प्रतिक्विंटल पातळीवर पोहोचले.
हे सुद्धा वाचा..
दिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या किमतीत मोठा बदल ; जाणून घ्या प्रति 10 ग्रॅमचा भाव
धक्कादायक ; तुझ्या अंगात एक जिन, शारीरिक संबंध ठेऊन पळवावे लागेल, मांत्रिकाचा शिक्षिकेवर बलात्कार
मंत्रीपदाचे काय करता? मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो ; शिंदे गटातील आ.किशोर पाटलांचे विधान
कोरोना पुन्हा डोकंवर काढतोय? हिवाळ्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता, महाराष्ट्रात अलर्ट जारी
स्थानिक बाजारात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला खुल्या एक किलो सोयाबीन तेलाची किंमत १२७ ते १३० रुपयापर्यंत होती. मात्र मागील काही दिवसांमध्ये यात वाढ झाली आहे. सध्या खुल्या एक किलो सोयाबीन तेलाची किंमत १३६ ते १४० रुपयापर्यंत आहे.