मुंबई : या आठवड्यात शनिवारी धनत्रयोदशीचा सण असून त्यापूर्वी वायदे बाजाराबरोबरच किरकोळ सराफा बाजारातही तेजी पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज सोन्याचा भाव 50290 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत आहे.
सोन्याची किंमत (वायदे बाजारात)
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा व्यवहार होत आहे. सोन्यामध्ये प्रति 10 ग्रॅम 100 रुपयांपेक्षा जास्त कमजोरी आहे. आज, MCX वर सोन्याचे डिसेंबर फ्युचर्स 111 रुपयांनी किंवा 0.22 टक्क्यांनी कमी होऊन 50303 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. यामध्ये बहुतांश व्यवसायाचा कल ५०२९०-५०३१० रुपयांदरम्यान दिसत आहे.
हे सुद्धा वाचा..
धक्कादायक ; तुझ्या अंगात एक जिन, शारीरिक संबंध ठेऊन पळवावे लागेल, मांत्रिकाचा शिक्षिकेवर बलात्कार
मंत्रीपदाचे काय करता? मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो ; शिंदे गटातील आ.किशोर पाटलांचे विधान
कोरोना पुन्हा डोकंवर काढतोय? हिवाळ्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता, महाराष्ट्रात अलर्ट जारी
तज्ञ काय म्हणतात?
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीची मागणी वाढते आणि मागणी वाढली की सोन्याच्या भावातही वाढ दिसून येते. यावेळीही धनत्रयोदशीसाठी सोन्या-चांदीच्या नाण्यांची बुकिंग आणि खरेदी सुरू झाली आहे. मात्र आतापर्यंत सोन्याच्या दरात केवळ घसरण दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात तो ४९,००० ते ५१,००० रुपयांपर्यंत राहू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.