नवी दिल्ली : केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना अटल पेन्शन योजनेने नवा विक्रम केला आहे. अटल पेन्शन योजना (APY) ही भारत सरकार द्वारे समर्थित आणि PFRDA (पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण) द्वारे प्रशासित एक हमी पेन्शन योजना आहे. ही योजना ९ मे २०१५ रोजी सुरू झाली होती. APY अंतर्गत जवळपास ४ कोटी लोकांनी नोंदणी पार केली आहे.
APY नियमांनुसार, 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती मासिक पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी APY खाते उघडू शकते. या योजनेंतर्गत, ग्राहकाला सेवानिवृत्तीच्या वयाच्या 60 व्या वर्षापासून केलेल्या योगदानानुसार 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते.
दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळेल
आम्ही तुम्हाला सांगतो की, अटल पेन्शन योजना कमी पैशांची गुंतवणूक करून पेन्शनची हमी देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. सध्या, अटल पेन्शन योजनेअंतर्गत, सरकार 60 वर्षांनंतर दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शनची हमी देते. अटल पेन्शन योजनेंतर्गत, दरमहा खात्यात निश्चित योगदान दिल्यानंतर, निवृत्तीनंतर, 1 हजार ते 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. सरकार दर 6 महिन्यांनी केवळ 1,239 रुपये गुंतवल्यास 60 वर्षांनंतर प्रति महिना 5000 रुपये म्हणजेच वार्षिक 60,000 रुपये आजीवन पेन्शनची हमी देत आहे.
हे सुद्धा वाचा..
मंत्रीपदाचे काय करता? मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो ; शिंदे गटातील आ.किशोर पाटलांचे विधान
कोरोना पुन्हा डोकंवर काढतोय? हिवाळ्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता, महाराष्ट्रात अलर्ट जारी
राज्यातील ‘या’ दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
दरमहा 210 रुपये द्यावे लागतील
सध्याच्या नियमांनुसार, वयाच्या 18 व्या वर्षी, मासिक पेन्शनसाठी योजनेत जास्तीत जास्त 5000 रुपये जोडल्यास, तुम्हाला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. हेच पैसे दर तीन महिन्यांनी दिल्यास ६२६ रुपये आणि सहा महिन्यांनी दिल्यास १,२३९ रुपये द्यावे लागतील. महिन्याला 1,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 42 रुपये द्यावे लागतील.