जळगाव : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र या विस्तारानंतर शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचा चर्चा रंगू लागल्या आहेत. किमान दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात तरी आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी आशा आता या आमदारांना असल्याचं बोललं जात आहे. अशातच आमदारांच्या नाराजीबाबत शिंदे गटातील जळगावचे आमदार किशोर पाटील यांना विचारले असता, त्यांनी मंत्रीपदाचे काय करता? मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो, असं विधान केलं आहे.
आमदार किशोर पाटील म्हणाले की, मला अजून सूत्र कळाले नाही. हे सूत्र कुठून येते? मी कधीही नाराज नव्हतो. मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, हे मंत्री काय करता? निश्चित मी मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. परंतु माझी नाराजी नव्हती. आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. संधी मिळाली तर नक्कीच त्याचं सोने करेन. मला जो विभाग मिळेल त्यामाध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय घेईन पण मी नाराज नाही एवढं नक्की असा खुलासा त्यांनी केला.
हे सुद्धा वाचा..
कोरोना पुन्हा डोकंवर काढतोय? हिवाळ्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता, महाराष्ट्रात अलर्ट जारी
राज्यातील ‘या’ दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
रेशन धान्य दुकानावर दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयात ; यांना मिळतोय लाभ, जाणून घ्या…
तसेच अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भारतीय जनता पार्टीने उमेदवार मागे घेण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे. एखाद्या घरातील आमदार दगावला असेल तर त्याच्या पत्नीला उमेदवारी दिली असेल तर ही महाराष्ट्राची परंपरा आहे. भाजपाने माघार घेतल्याने अतिशय चांगला निर्णय घेतला असून मी त्यांचे मनापासून कौतुक करतो असंही आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं.