मुंबई : खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही खतांची खरेदी करत असाल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे कृषी सहसंचालकांनी तब्बल 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणिक आढळल्याने त्याच्यावर बंदी घातली असून ही खते शेतकऱ्यांनी खरेदी करू नये, असे देखील आवाहन करण्यात आले आहे. नेमकी का आणि कशासाठी ही बंदी घालण्यात आली आहे, हे जाणून घेऊ.
खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणी घेण्यात आले होते. यातून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत (Fertilizer) विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये, असे आवाहन देखील आता कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ही खते खरेदी करू नये
शेतकऱ्यांनी जिंकेटेड एस एस पी, रामा फॉस्फेट उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल्स नाशिक स एस पी के पी आर, ऍग्रो केम, यासह विविध 19 खतांचे नमुने अप्रमणित आढळून आल्याने ही बंदी घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा..
राज्यातील ‘या’ दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
रेशन धान्य दुकानावर दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयात ; यांना मिळतोय लाभ, जाणून घ्या…
दरम्यान, या खतांवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांनी देखील आता सतर्क होणे गरजेचे आहे. अप्रमणित झालेल्या खतांचा काळाबाजार रोखण्याचे देखील आव्हान आता कृषी विभागासमोर निर्माण झाले आहे. तब्बल 19 खतांच्या विक्रीवर राज्यात बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत परवडतील अशी खते बाजारात आणण्याची देखील आवश्यकता या निमित्ताने निर्माण झाली आहे.