कंत्राटदाराचे एमआयडीसी पोलिसाना निवेदन ; कारवाईची मागणी
जळगाव – भारत पेट्रोलियमच्या एमआयडीसी प्लांटमधील शेकडो जगवलेली झाडे व्यवस्थापकासह इतरांनी बेकायदेशीररीत्या तोडून त्यांची विल्हेवाट लावली असल्याचा आरोप कंत्राटदाराने केला असून याबाबत कारवाई करण्याचे निवेदन एमआयसीसी पोलीस निरीक्षकांना दिले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी कि , जळगावातील कंत्राटदार व नर्सरी चालक असलेले असलेले एनआर जाधव यांनी भारत पेट्रोलियम येथे २० एकर जागेत झाडे लावून ती जागविली होती . मात्र मोठी झालेल्या या झाडांची कत्तल गेल्या काही दिवसांपासून होत असून त्यांची मोठ्या प्रमाणत विक्री करण्यात येऊन विल्हेवाट लावण्यात आली आहे . यात व्यवस्थापक अमित नरुला , अमित व्यास व इतरांनी मिळून हि झाडे तोडून संगनमताने त्यांची विल्लेवाट लावल्याचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. क्करवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.