मुंबई,(भूषण पाटील)- तमाम क्रिकेट प्रेमिसाठी महत्वाची बातमी समोर आली असून भारतीय टिम पुढच्या वर्षी होणाऱ्या ‘एशिया कप’ च्या मॅचेस खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचा निर्णय आज मंगळवारी झालेल्या Annual General Meeting मध्ये बीसीसीआई चे चेअरमन जय शहा यांनी घेतला असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.भारत पाकिस्तान जाणार नसून भारत एशिया चषक “न्युट्रल वेन्यू” वर खेळेल. म्हणजेचं भारत पाकिस्तानला न जाता युएई किंवा ओमान या देशांमध्ये क्रिकेट खेळेल.BCCI च्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मोठा झटका दिल्याचे मानले जात आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 2023 मध्ये आशिया चषकाचे यजमानपद मिळाले होते, मात्र त्याच दरम्यान आशिया चषकाचे यजमानपद त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ आशिया चषक आणि जागतिक स्पर्धांमध्येच एकमेकांशी खेळतात त्यामुळे दोन्ही देशांमधील राजकीय तणाव आहे. गेल्या महिन्यात आशिया कपमध्ये दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते. आता दोन्ही संघ 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये आमनेसामने येणार आहेत.
टीम इंडिया 17 वर्षांपासून पाकिस्तानात गेली नाही भारतीय संघ 2005-06 मध्ये शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेला होता. त्या दौऱ्यावर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा 4-1 असा पराभव केला. आता 17 वर्षे उलटून गेली असून टीम इंडियाने पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवलेले नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकाही 10 वर्षांपासून झालेली नाही. 2012 मध्ये पाकिस्तानी संघ शेवटच्या वेळी भारत दौऱ्यावर आला होता. ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली गेली.
मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या एजीएमनंतर जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध खेळायला जाणार नाही. बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या यापूर्वी मीडियामध्ये आल्या होत्या पण जय शाह यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. भारताने पाकिस्तानशी सामना खेळला तर तो तटस्थ ठिकाणी होईल, असे जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले.