मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राऊतांना अद्यापही दिलासा मिळाला नसून त्यांच्या जामिनावरील सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान सत्र न्यायालयात लिफ्टजवळ संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट झाली. न्यायालयाच्या कामकाजाकरिता खडसे हे आज मुंबईत होते. त्याच दरम्यान एकनाथ खडसे यांनी बाहेर आल्यावर माध्यमांशी बोलत असतांना संजय राऊत यांच्याशी बोलणं झाल्याचे त्यांनी सांगितले आहे
संजय राऊत खोके नाही म्हणाले पण चिंता करू नका सगळं ओके आहे म्हणाले. काळजी करू नका मी लवकरच बाहेर येईल असेही राऊत म्हणाल्याचे खडसे यांनी सांगितले आहे.
पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती, त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी होती. आज जिल्हा सत्र न्यायालयात खासदार संजय राऊतांना आणण्यात आले होते, त्याच दरम्यान लिफ्ट जवळ संजय राऊत आलेले असतांना एकनाथ खडसे यांची भेट झाली आहे.
हे सुद्धा वाचा..
दिवाळीपूर्वी ‘या’ योजनेत मुलांची नोंदणी करा ; सरकार देणार लाखो रुपये
बापच बनला हैवान : 3 वर्षांपासून करत होता पोटच्या मुलीवर बलात्कार
धक्कादायक ; पाल परिसरात निर्जनस्थळी नेवून केला आळी पाळीने सामुहिक बलात्कार
मोठी बातमी ! शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका
एकनाथ खडसे हे देखील न्यायालयाच्या कामकाजाकरिता जिल्हा सत्र न्यायालयात आलेले होते, त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. एकनाथ खडसे यांनी यावेळी बाहेर असेलेल्या माध्यम प्रतिनिधींना भेटीत संजय राऊत काय बोलले ही माहिती दिली आहे.
“संजय राऊत म्हणाले ओके है सब, काही चिंता करू नका म्हणे, आताच बाहेर येणार म्हणे मी” असं खडसे म्हणाले. खोक्यासंदर्भात काही बोलले का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, “खोके नाही, ओके आहे बोलले” अशी मिश्किल टिपण्णी खडसेंनी केली. “राऊत साहेबांशी लिफ्टजवळ भेट झाली माझी, दोन मिनिटं ते बोलले, सब कुछ ओके है, तुम्ही काळजी करु नका” असं बोलल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं.