फलटण : राज्यातील अनेक भागात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. याच दरम्यान, सातारा जिल्ह्यात काळीज हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुराच्या पाण्यात एक अर्टिगा कार बुडाली. या कारमध्ये वडील आणि मुलगी जे अडकले, ते जिवंत बाहेर येऊ शकले नाही. मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या थरारक घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या दुर्देवी घटनेत छगन उत्तम मदने (वय- 38) व त्यांची मुलगी प्रांजल छगन मध्ये (वय- 12, रा. वारुगड, ता. माण) या बापलेकीचा मृत्यू झाला आहे.
सोमंथळी-सस्तेवाडी दरम्यान ही दुर्घटना घडली. साताऱ्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरुन वाहून लागले होते. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पुराच्या पाण्याचा प्रवाह सुरु झाला होता. अशात एका मार्गावरुन जात असताना मुलगी आणि वडिलांवर काळानं घाला घातला.
https://twitter.com/ssidsawant/status/1582288165217652736
अर्टिगा कार पुराच्या पाण्यात अडकली. पुराच्या पाण्यातील बाहेर पडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण तो अपयशी ठरला. बघता बघता संपूर्ण कारमध्ये पाणी शिरलं. पुराच्या पाण्याने अर्टिका कारला गिळंकृत केलं. यामुळे कारच्या आतमध्ये असलेल्यांना बाहेर पडण्याची संधीसुद्धा मिळू शकली नाही. कारच्या आतमध्येच वडील आणि मुलगी अडकले गेले.