मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे
यांच्या स्मृतींना अभिवादन केले. मात्र, या वेळी संतप्त शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी शिवतीर्थ दणाणून सोडला. सकाळपासून शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले असताना भारतीय जनता पक्षाच्या मात्र एकही नेत्याने शिवतीर्थावर हजेरी लावलेली नव्हती. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतींना अभिवादन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी न बोलताच निघून गेले.