सोलापूर । प्रतिनिधी- आळंद तालुक्यातील निरगुडी मठाचे संस्थापक आणि भिगवण तसेच गोवा आणि देश विदेशातील अनेक मठांचे महाराज असलेले आणि जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष हवा मल्लिन्नाथ महाराज यांना आज गुलबर्गा येथे एशिया फोरम कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी चेन्नई यांच्या वतीने डॉक्टरेट ही मानद पदवी देऊन त्यांचा गौरव व सन्मान करण्यात आला.
जय भारत माता सेवा समिती (रजिस्टर) नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष परमपूज्य श्री हवा मल्लीनाथ महाराज निरगुडी यांच्या देशभक्ती आणि समाजसेवेचा गौरव म्हणून “एशिया फोरम कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी चेन्नई” च्या वतीने पुज्य अप्पाजी यांना कलबुर्गी येथे आज डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. हवा मल्लिन्नाथ महाराज यांनी आजपर्यंत देशभरात अनेक सामाजिक देशभक्ती पर कार्यक्रम घेत समाजांमध्ये जनजागृती करत आहेत.
लोकांमध्ये देश भक्ती वाढविणे, समाजा- समाजात सौदारह निर्माण करणे एकोपा निर्माण करणे जातीव्यवस्था नष्ट करणे असे अनेक समाजपयोगी कार्य आपल्या संस्थेच्या माध्यमातून करत ते समाजप्रबोधन ही करत आहेत, याचीच दखल घेत आज चेन्नई येथील एशिया फोरम कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी ने हवा मल्लिन्नाथ महाराज यांना मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन आज गौरव केला आहे.
आज पर्यत समाजप्रबोधन करत मठ सांभाळणा-या महाराजांमध्ये हवा मल्लिन्नाथ महाराज हे एकमेव महाराज ठरले आहेत की ज्यांचा एका राज्यातील बड्या युनिव्हर्सिटी ने मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
आळंद तालुक्यात अनेक महाराज होऊन गेले परंतु त्या महाराजांनी राजकारण आणि केवळ अर्थकारण या पलीकडे कोणतेही कार्य केले नाही परंतु हवा मालिनाथ महाराज यांच्या कार्याला कुठेच तोड नाही हे भिगवण आणि गोवा येथे असलेल्या मठांवरून दिसून येते अशी प्रतिक्रिया सोलापूर येथील मालिनाथ महाराजांचे निस्सीम भक्त निलकंठय्या स्वामी आणि जेष्ठ विधिज्ञ आळंगे वकील यांनी व्यक्त केली
मालिनाथ महाराजांचा आज गुलबर्गा येथे गौरव झाला. त्यांना चेन्नई विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान केला आहे त्यांचा हा सन्मान म्हणजे त्यांनी देशभरात चालू केलेल्या राष्ट्रीय कार्याचा सन्मान आहे, हवा मल्लिन्नाथ महाराज हे निस्वार्थी आणि समाजसेवक आहेत त्यांनी कधीही नातेगोते जपले नाहीत त्यांनी मठ वाढीसाठी आणि मठांचा विकास होण्यासाठी च कार्य केले आहेत,त्यांच्या कार्याला तोड नाही.
– रविकांत कुरे
हवा मल्लिन्नाथ महाराजांचे भक्त खानापूर