Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही: पाटील

najarkaid live by najarkaid live
November 15, 2019
in राज्य, राजकारण
0
भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही: पाटील
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई: राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपच नंबर वन असून राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही. ज्यांच्याकडे ११९ आमदार आहेत, त्यांना घेतल्याशिवाय राज्यात कुणाचंही सरकार बनू शकणार नाही. राज्यात येणार सरकार भाजपचंच असेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस  यांनीही कालच राज्यात भाजपशिवाय राज्यात कुणाचंही सरकार येणार नाही, असा दावा केला होता. त्यामुळे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाजपच्या चिंतन बैठकीतील माहिती दिली. यावेळी त्यांनी आमचीही राज्यातील राजकीय घडामोडींवर नजर असल्याचं सांगितलं. भाजपचे १०५ आमदार असून आम्हाला १४ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमच्याशिवाय कुणाचंही सरकार बनू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनीही आजच्या बैठकीत हेच स्पष्ट केल्याचं सांगतानाच कुणाबरोबरही कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

भाजपच नंबर वन

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या बैठकीत विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आलं. एका सादरीकरणाच्या माध्यमातून भाजप कसा नंबर वन आहे, हेही दाखवण्यात आलं. राज्यात भाजपला सर्वाधिक १ कोटी ४२ लाख मते मिळाली आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीला ९२ लाख आणि शिवसेनेला ९० लाख मते मिळाली आहेत. भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत २६२ जागा लढल्या होत्या, त्यापैकी १२२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी १२४ जागा लढवून भाजपने १०५ जागा जिंकल्या आहेत. १९९० नंतर कोणत्याही पक्षाला शंभर जागा जिंकत्या आल्या नव्हत्या. मात्र शंभरपेक्षाही अधिक जागा जिंकण्याची किमया भाजपने केली आहे. काँग्रेस आघाडीलाही शंभर जागा जिंकता आल्या नाहीत, असं सांगतानाच भाजपच्याच सर्वाधिक १२ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत, असंही ते म्हणाले. भाजप ५९ जागांवर पराभूत झाली आह. त्यापैकी ५५ जागांवर भाजपने दुसऱ्या क्रमांकांची मते घेतली आहेत. इतर पक्षातून आलेल्या २६ उमेदवारांपैकी १६ उमेदवार निवडून आल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

राहुल गांधी माफी मागो आंदोलन’

यावेळी त्यांनी राफेलप्रकरणी भाजप देशव्यापी ‘राहुल गांधी माफी मागो’ आंदोलन छेडणार असल्याचंही सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेलप्रकरणी माफी मागितली आहे. राफेलच्याच मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली होती. आता त्यांनी देशाचीही माफी मागायला हवी. त्यामुळे आम्ही ‘राहुल गांधी माफी मागो’ आंदोलन छेडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आमदारांना मतदारसंघात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याच्या सूचनाही शेतकऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांचा २३ हजार कोटींचा विमा आहे, तो त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासही सांगण्यात आल्याचं ते म्हणाले. या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुकीवर चर्चा करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!; फडणवीसांना टोला

Next Post

राफेल: …म्हणून सरकारने केली कायद्यात दुरुस्ती- पृथ्वीराज चव्हाण

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
राफेल: …म्हणून सरकारने केली कायद्यात दुरुस्ती- पृथ्वीराज चव्हाण

राफेल: ...म्हणून सरकारने केली कायद्यात दुरुस्ती- पृथ्वीराज चव्हाण

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us