पुणे : राज्यात बसला लागणाऱ्या आगीच्या घटना सातत्याने वाढतच आहे. गेल्या काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये प्रवासी बसला आग लागल्याने ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथून बसला अचानक आग लागल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.
कल्याणवरून भीमाशंकरला जाणारी ही प्रवासी बस अचानक पेटली. मंचर-भीमाशंकर रोडवरील घोडेगावजवळच्या शिंदेवाडी इथे ही घटना आज सकाळी घडली. या बसमधून 27 प्रवासी प्रवास करत होते. आगीमध्ये ही बस पूर्णपणे जळून खाक झालीय. सुदैवानं या घटनेमध्ये कोणताही जीवितहानी झाली नाही. मात्र भरस्त्यातच या बसने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. MH 05 DK 9699 क्रमांकांची ही बस होती.
https://twitter.com/ssidsawant/status/1580047328257671168
घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात बस आग लागल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आल्याचं दिसतं. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आसपासचे नागरिक याठिकाणी पोहोचले. नागरिकांनी बसवर पाणी ओतून ही आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या घटनेत बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत.