मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला या चिन्हाचा वापर निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत करता येणार नाहीये. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तृळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ज्याची भीती होती तेच अखेर घडलं असं म्हंटल आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
धनुष्यबाण गोठवलं यांचं मला अजिबात आश्चर्य वाटतं नाही, हे होणारच याची मला खात्री होती .. अखेर तेच घडलं असं पवार म्हणाले. योग्य निर्णय दिले जातील याची आता खात्रीही नाही, असा टोला देखील पवारांनी यावेळी लगावला आहे. मी स्वतः वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आहे. त्यामुळे चिन्हाचा जास्त काही फरक पडत नाही .. लोकच सर्व काही ठरवतात. चिन्ह असो वा नसो निवडणुकीला सामोरे जायची तयारी ठेवली पाहिजे असा सल्ला पवारांनी दिला.
हे पण वाचाच :
पतीचे दुसऱ्या तरुणीसह अनैतिक संबंध ; नंतर पतीने जे केलं ते धक्कादायकच
शिवसेनेचं नवं चिन्ह काय असणार? उद्धव ठाकरेंच्या खास माणसाचे ट्विट करत जाहीर केलं नाव आणि फोटो
सणासुदीच्या खरेदीवर SBI देतेय कॅशबॅक ; ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंतच
राज्यातील या ठिकाणी 7 वी पाससाठी मोठी संधी ; तब्बल 47,000 रुपये महिना पगार मिळेल
शिवसेना संपणार नाही तर उलट शिवसेना अधिक जोमाने उभी राहील. शिवसेनेतील तरुण पिढी जिद्दीने उठेल आणि आपली शक्ती वाढवेल असं शरद पवारांनी म्हंटल. राज्यात महाविकास आघाडी कायम राहील. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी कायम एकत्र राहतील असेही त्यांनी स्पष्ट केलं.