उद्धव ठाकरे गट व शिंदे गट दोन्ही बाजूंकडून शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा सांगणारी कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. यानंतर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक दिल्लीत पार पडली. सुमारे चार तास झालेल्या या बैठकीनंतर शिवसेनेचे धनुष्यवाण हे निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठविण्याचा अंतरिम निर्णय घेण्यात आला.या निर्णयाने राज्यातील राजकारण चांगलेच तापले असतांना शिवसेनेने सामनातून ‘प्रहार’ केला असून भारतीय निवडणूक आयोग व शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.
शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून ‘प्रहार’
चिन्ह गोठवले, पण रक्त पेटवले…
केंद्रीय निवडणूक आयोगाने धक्कादायक निर्णय घेत शिवसेना पक्षाचे धनुष्यवाण हे चिन्ह गोठवल्याने महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. शिवसैनिकांमधून आणि शिवसेनाप्रेमी जनतेतून आयोगाच्या निर्णयावर चीड व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेवर असे कितीही आघात केले तरी शिवसेना मागे हटणार नाही. शिवसैनिक जिद्दीने पेटून उठला आहे. त्याचे रक्त उसळले आहे. याच जिद्दीच्या जोरावर शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक जिंकणारच, असा निर्धार अनेक शिवसैनिकांनी बोलून दाखवला आहे.
लढणार आणि जिंकणारच !
शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याचे वृत्त येताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.आम्ही लढणार आणि जिंकणारच, असा निर्धार शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आयोगाच्या निर्णयानंतर व्यक्त केला आहे. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेनेचे चिन्ह गोठविण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच. आम्ही ! जयते!, असे ट्विट अत्याच्या बाजूने सत्यमेव जयते। अ आदित्य ठाकरे यांनी फेसबुकवरही हरिवंशराय बच्चन यांची ‘अग्निपथ’ ही कविता पोस्ट करून लढण्याचा निर्धार केला आहे. हरिवंशराय म्हणतात, ‘तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुड़ेगा कभी… कर शपथ। कर शपथ कर शपथ!… अग्निपथ अग्निपथ ! अग्निपथ!’
निवडणूक आयोगाने शिवसेनेला बाजू मांडण्याची संधी न देता केवळ एक बैठक घेऊन आपला निर्णय दिल्याने त्यावरून शिवसैनिकांनी तीव्र शब्दांत चीड व्यक्त केली. आयोग कोणाच्या दबावाखाली आणि इशाऱ्याने काम करत आहे, असा सवाल शिवसैनिकांनी विचारला. ‘देशात हुकूमशाहीची चिन्हे दिसत आहेत.निवडणूक आयोगाने मालकाशी इमान राखत निर्णय दिला २०२४च्या निवडणुकीत मतदाराला भाजप आणि लोकशाही यातील एक काहीतरी निवडावे लागेल, ‘सत्य परेशान हो सकता है, परास्त नही’, अशा तिखट प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून उमटल्या.
गद्दारांनो, कुठे फेडाल हे पाप ?
खोकेवाल्या गद्दारांमुळे शिवसेनेचे चिन्ह गोठवले गेले आहे. त्यावरून निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना खडे बोल सुनावले. गद्दारांनो, कुठे फेडाल हे पाप, असा सवालच अनेक शिवसैनिकांनी विचारला. गद्दारांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. त्यांनी जे पाप केले आहे त्याचा हिशेब येथेच होणार आहे. रक्ताचे पाणी करून आम्ही गद्दारांना धडा शिकवू, असेही शिवसैनिकांनी निक्षून सांगितले.
काय आहे प्रकरण…
शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह मिळावे असा दावा करणारी याचिका निवडणूक आयोगापुढे करण्यात आली होती. यासंदर्भात शिवसेना तसेच शिंदे गटाला शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश आयोगाने दिले होते. त्यानुसार दोन्ही बाजूंकडून शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा सांगणारी कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती.
काय झाला निर्णय
धनुष्यवाण हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा असून केवळ आगामी निवडणुकीपुरता मर्यादित आहे. शिवसेना पक्ष खरा कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या कुणालाही शिवसेना हे स्वतंत्र नाव वापरता येणार नाही, मात्र शिवसेना आपल्या गटाचे नाव देता येईल असे आयोगाने आदेशात म्हटले आहे. निवडणूक चिन्ह व पक्षाच्या नव्या नावासंदर्भात तीन पर्याय सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत सुचवावेत असे निर्देश आयोगाने दिले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने फक्त चार तासांच्या बैठकीत आज धक्कादायक निर्णय घेतला आणि शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच गोठवले. आयोग एवढ्यावरच थांबला नाही, तर शिवसेना हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेशही शिवसेनेसह शिंदे गटाला दिला. हे दोन्ही निर्णय अंधेरी पोटनिवडणुकीसाठी असल्याचे आयोगाने म्हटले आहे. सोमवारपर्यंत पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह सुचवावे, असे निर्देशही आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. हा तर लोकशाहीचा मुडदा पाडण्याचाच प्रकार असून अंधेरी निवडणुकीसाठी आयोगाने केलेली ही मॅचफिक्सिंग असल्याची संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.
निवडणूक न लढणाऱ्या शिंदे गटाला चिन्ह हवेच कशाला?
शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे शनिवारी लेखी निवेदन सादर केले. या प्रकरणात जोपर्यंत शिवसेना पक्षासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर होत नाहीत तोपर्यंत धनुष्यवाण या निवडणूक चिन्हाबाबतच्या याचिकेवर सुनावणी करू नये, अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात आली. अंधेरी या नावापुढे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही. मग धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा कशासाठी केला जात आहे, असा जोरदार युक्तीवाद शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगापुढे करण्यात आला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक शिंदे गट लढणार नसल्याची माहिती माध्यमांतून पुढे आली आहे.