मुंबई : दसरा मेळाव्याला अवघे काही तास उरलेले असतानाच शिंदे गटाकडून थेट ठाकरे घराण्यावर टीका करण्यात आली आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरावा की वापरू नये हे आम्हाला बोलण्याचा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांना आहे. आदित्य ठाकरे यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही जेव्हा राजकारण सुरू केलं. तेव्हा आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नसेल. त्यांनी सांभाळून बोलावं. नाही तर आम्ही तोंड उघडलं तर पळावं लागेल, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. गुलाबराव पाटील यांनी थेट ठाकरे कुटुंबावरच टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
हे पण वाचा :
कुणाचं घड्याळ हरवलंय का? कदाचित उर्फीजवळच असेल, ‘हा’ VIDEO पाहून व्हाल चकित
‘असा’ विवाह करा अन् मिळवा 3 लाख रुपये ; जाणून घ्या महाराष्ट्र सरकारच्या ‘या’ योजनेबाबत
दसरा मेळाव्यांविषयीची उत्सुकता शिगेला; आज शाब्दिक तोफा धडाडणार
दसऱ्याच्या दिवशी केले जाते रावणाचे दहन ; जाणून घ्या दहनाचा शुभ मुहूर्त
तसेच पुढे तुम्हाला शिवसैनिक आणण्याचं टार्गेट दिलं आहे का? असा सवाल केला असता गुलाबराव पाटील म्हणाले आम्हाला कोणतंही टार्गेट नाही. आमचं टार्गेट शिवसैनिक आहे. तो न बोलविता येत असतो. आता कुणी पायी तर येणार नाही. वाहनांची व्यवस्था तर करावीच लागेल. आम्ही 1966 साली जेव्हा यायचो. तेव्हा फक्त छातीला बिल्ला असायचा. शिवसेना जिंदाबादच्या घोषणा असायच्या. रेल्वेतून यायचो. आता काळ बदलला आहे. जसा काळ बदलतो, तसं बदलावं लागतं, असं ते म्हणाले.