भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली होती. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आलेल्या या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी नागपूर येथे विजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायी यांच्यासह ‘बौद्ध’ धम्म स्वीकारला धम्म दिक्षा सोहळा दोन दिवस पार पाडला.धम्म स्वीकारण्यासाठी येणारे अनुयायी ‘बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार‘ अशा घोषणा देत नागपुरात दुमदुमल्या होत्या.
बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी विजयादशमीचा दिवस का निवडला
इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात “अशोक विजयादशमी” म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा घेत मोठी धम्मक्रांती केली.
वियादशमीचा त्या दिवशी तारीख होती १४ ऑक्टोबर १९५६ या वेळी आपल्या पाच लाख अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन हिंदू धर्मातून बाहेर पडत बौद्ध धम्म स्वीकारला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीमुळे नागपुराला नवी ओळख मिळाली तेव्हा पासून दिक्षाभूमी म्हणून ओळखली जाते.
धर्मचक्रअनुप्रवर्तन दिन म्हणून उत्सव साजरा होतो
धर्मचक्रअनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध उत्सव आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी साजरा केला जातो. लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी नागपूर येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात.
नागपूर शहराची निवड करण्यामागे होतं हे कारण…
बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी ‘दीक्षासमारंभ’ कार्यक्रमाकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर शहराचे स्थळ निवडण्यामागे सुद्धा कारण होतं ते म्हणजे बुद्धधर्मीय नागलोक यांची ती पुण्यभूमी आहे त्यामुळे बौद्ध धर्माचं चक्र गतिमान कऱण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली.
‘या’ पत्रकातून जाहीर केली धर्मांतराची तारीख
धर्मांतरासाठी डॉ. बाबासाहेबानी २३सप्टेंबर १९५६ रोजी एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकातून १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपण धर्मांतर करत असल्याचं जाहीर केलं. तीन दिवस आधीच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी ११ ऑक्टोबरला नागपुरात आले. बाबासाहेब नागपूरला आल्याचे कळताच अनुयायी गावागावातून, खेड्यापाड्यातून लाखोच्या संख्येने नागपुरात येऊ लागले. अनेकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून बौद्ध धम्म स्वीकारला.’बाबासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार’ अशा घोषणा नागपुरात दुमदुमल्याआणि वयोवृद्ध भिक्खु महास्थविर चंद्रमणी यांच्या कडून धम्म दिक्षा घेतली.