उत्तराखंडमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका लग्नाचे वऱ्हाडी घेऊन जात असतांना सिमडी गावाजवळ ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या बसमध्ये ५० जण होते.पौडी येथे मंगळावरी रात्री ८ वाजेच्या च्या सुमारास हा अपघात झाला.
ही बस दुपारी बाराच्या सुमारास बस लालडंग येथून कांडा मल्लाच्या दिशेने निघाली होती. ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत जाऊन कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की २० जणांचा यात मृत्यू झाला आहे. तर, उर्वरीत लोकांचा शोध सुरु आहे.
अपघाताचे वृत्त समजताच श्रीनगर, कोटद्वार, सातपुली आणि रुद्रपूर येथील एसडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थही बचावकार्यात मदत करत आहेत.
Pauri Garwhal bus accident #UPDATE | 9 injured people have been rescued by Pauri Garhwal Police, tweets Uttarakhand Police
A bus carrying 45 to 50 people fell into a 500-metre gorge on Rikhnikhal-Birokhal road near Simdi village in Pauri Garhwal district today. pic.twitter.com/izaDojj7Se
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 4, 2022