जयपूर ; जयपूरमधील मुहाना पोलिस स्टेशन अंतर्गत युनिक सॅफायर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बँकेच्या मार्केटिंग मॅनेजर सुरभी कुमावत (३०) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यामध्ये “पती माझा आणि मुलीचा तिरस्कार करतो. म्हणून मी वैतागून जाते आहे” असं म्हटलं आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बँकेच्या मार्केटिंग मॅनेजरच्या संशयास्पद मृत्यूने पोलिसांसह अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांनाही धक्का बसला. या हायप्रोफाईल आत्महत्या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे सुरभीची प्रेमकथा. धक्कादायक बाब म्हणजे सुरभीने MBA केलं आहे. तर तिचा नवरा फक्त सहावी पास आहे. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करताना सुरभीची साहिद अलीसोबत ओळख झाली. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2016 मध्ये सुरभी आणि साहिद अलीने गाझियाबादला जाऊन आर्य समाजात लग्न केले. ती पत्नी आणि मुलीसह राहत होती.
पोलीस चौकशीत शाहिदने सांगितले की, तो शनिवारी रात्री एका कार्यक्रमातून पत्नी आणि मुलीसोबत परतला होता. त्यानंतर ते तिघेही खोलीत झोपले. रात्री उशिरा सुरभी दुसऱ्या खोलीत गेली. तिथे तिने गळफास घेतला. त्याने सकाळी सुरभीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सुरभीच्या आत्महत्येने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, मला कोणीही समजून घेत नाही
पोलिसांना खोलीत सुरभीने लिहिलेली सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये लिहिले होते की मला कोणीही समजून घेत नाही, प्रत्येकाला दुखवायचे आहे. मला फक्त आनंदी रहायचे आहे आणि मला कोणाच्याही आयुष्यात समस्या बनवायची नाही. माझा स्वतःचा नवरा माझा तिरस्कार करतो आणि मला सोडून जाण्याची धमकी देतो. स्वार्थी कारणांसाठी माझा वापर केला गेला. मी सर्वकाही सोडणार आहे… मला वाईट वाटते की मी तुला पाहू शकणार नाही.