जळगाव : राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे खडसे पुन्हा भाजपात येणार अशी चर्चाही सुरु झाली होती. मात्र, अशातच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खडसेंबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील एका कार्यक्रमात एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस आणि मला भेटले. यावेळी फडणवीसांच्या कानात खडसेंनी एकदा भेटून मिटवून टाकू असं सांगितल्याचा गौप्यस्फोट महाजनांनी केला आहे. महाजनांच्या गौप्यस्फोटानंतर खडसेंना भेटून नेमकं काय मिटवायचंय? खडसे भाजपमध्ये जाण्याच्या विचारात आहेत का? अशा अनेक चर्चांना उधाण आलंय.
जळगावातील एका कार्यक्रमानंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नाशिकमधील एकनाथ खडसेंचा तो काय किस्सा याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले.
हे पण वाचा :
प्रवाशांनो लक्ष द्या ! दसरा, दिवाळीनिमित्त भुसावळ विभागातून धावणार ‘या’ गाड्या
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. या शेतकऱ्यांच्या खात्यात १५ दिवसात होणार ‘इतके’ पैसे जमा
कोणत्या बँकेत सर्वात स्वस्त शैक्षणिक कर्ज मिळते? पहा येथे बँकांची यादी
मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
खडसेंनी बसू, मिटवून टाकू असे म्हणल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बैठका आणि निर्णय होणे महत्वाचे आहे. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की, मग त्यांच्यासोबत बसून त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकूण घेतले जाणार असल्याचे महाजनांनी सांगितले.
एकनाथ खडसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमके काय झाले ? असे विचारले असता याबाबत देवेंद्र फडणवीसच अधिक व्यवस्थित सांगू शकतील असे महाजन म्हणाले आहे. महाजनांच्या गौप्यस्फोटानंतर खडसेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे? याची जोरदार चर्चा होत आहे.