दिल्ली : दिल्लीतील सुंदर नगरी भागात एका २५ वर्षीय तरुणावर तीन जणांनी धारदार चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आश्चर्याची बाब म्हणजे मृत मनीषची हत्या होत असताना एवढ्या गजबजलेल्या गल्लीत त्याला कोणीही वाचवायला आले नाही. लोक फक्त शांतपणे उभे राहून पाहत होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य दिल्ली परिसरात राहणारा मनीष (२५ वर्षे) याची शनिवारी संध्याकाळी तीन आरोपींनी चाकूने वार करून हत्या केली. फैजान, बिलाल आणि आलम अशी आरोपींची नावे आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आजूबाजूचे लोकही घटनास्थळी हजर होते, पण मनीषला वाचवण्याचे धाडस कोणीच दाखवू शकले नाही. हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपी मनीषवर एकामागून एक चाकूने कसे वार करत होते, हे स्पष्ट दिसत आहे.
Murder In Delhi: सुंदर नगरी में चाकू से गोदकर युवक की हत्या, इलाके में तनाव; तीन गिरफ्तार pic.twitter.com/dGlkwBiT3D
— Abhishek Tiwari (@abhishe_tiwary) October 2, 2022
मनीषचा गुन्हा एवढाच होता की तो त्याच्यावर झालेल्या गुन्ह्यावर कोर्टात साक्ष देत होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार 1 वर्षापूर्वी मनीषकडून त्याचा मोबाईल हिसकावण्यात आला होता. त्यादरम्यानही त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, त्याच्या मानेवर व पोटावर चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मनीषच्या तक्रारीवरून कासिम आणि मोहसीन या दोन आरोपींना अटक केली. आता कासिम आणि मोहसीनचे जवळचे मित्र मनीषवर खटला मागे घेण्यासाठी सतत दबाव आणत होते, असा आरोप आहे.