कोल्हापूर,(प्रतिनिधी)- स्वतःच्याचं घरात ‘गुप्तधन’ असल्याचं स्वप्न पडत असल्याने मांत्रिकाच्या सहाय्याने काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले… एका मांत्रिकाच्या संपर्कात येत मांत्रिकाला घरातले ‘गुप्तधन’ काढण्यासाठी तगादा लावल्याने मांत्रिकाने महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पोलीस तपासात अनेक धक्कादायक विषय समोर आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील खुर्द ता. करवीर) येथील शेतात आरती आनंद सामंत यांचा झालेला खून हा गुप्तधन शोधाच्या तगाद्याला कंटाळून मांत्रिकाने केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून पुढे आली आहे. याप्रकरणी मांत्रिक नामदेव श्यामराव पोवार (३४) याला अटक करण्यात आली आहे.महिलेला घरातील गुप्त धनाचे स्वप्न पाहणं खूप महागात पडलं आहे.
पाडळी खुर्द येथे शेतात गुरुवारी रात्री ८ वाजता आरती सामंत (४५) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. करवीर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी संशयित मांत्रिक नामदेव पोवार याला राशिवडे येथील बिरदेव मंदिराच्या आवारात अटक केली आहे.
आपल्या घरात गुप्तधन असल्याचे स्वप्नात येत असल्याचे मृत आरती सामंत या वारंवार सांगत होत्या. त्यांनी काही मांत्रिकांना गुप्तधन काढून देण्याबाबत तगादा लावला होता. पुलाची शिरोली येथीलही एका मांत्रिकाला त्यांनी गुप्तधनाबाबत माहिती दिली. त्याचे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध वाढले होते, त्यानंतर सहा महिन्यांपासून सामंत यांनी नामदेव पोवार याही मांत्रिकामागे गुप्तधन शोधून देण्याबाबत तगादा लावला.मृत सामंत यांनी गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाच्या मदतीने स्वतःच्या घरात १५ फूट खोल खड्डा खोदला होता.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.