रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठी संधी चालून आलीय. ईस्टर्न रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. ज्या इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्थात er.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करावा. भारतीय रेल्वेतर्फे एकंदर 3115 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होतेय.
रिक्त पदांचे नाव :
एकूण रिक्त पदे:- 3115
हावडा डिव्हिजन:- 659
लिलुआ वर्कशॉप:- 612
सियालदह डिव्हिजन:- 440
कांचरापाडा वर्कशॉप:- 187
मालदा डिव्हिजन:- 138
आसनसोल वर्कशॉप:- 412
जमालपूर वर्कशॉप:- 667
पात्रतेचे निकष:-
इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत किमान 50% गुण मिळवणं आवश्यक आहे. तसंच एनसीव्हीटी/एससीव्हीटीद्वारे दिलेल्या पत्रकानुसार संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट मिळवलेलं असायला हवं.
वयोमर्यादा:-
अर्ज करणार्या उमेदवाराचं वय हे 15 ते 24च्या दरम्यान असायला हवं. अर्ज करताना उमेदवारांनी ही महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी.
निवड प्रक्रिया:-
पात्र उमेदवारांची योग्यता आणि आयटीआयचे सरासरी गुण पाहिले जातील. त्यातून निवड झालेल्या उमेदवारांनाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येईल.
हे पण वाचा :
भारतीय पोस्टात 8वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स.. तब्बल 63,000 रुपये पगार मिळेल
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, अर्ज कुठे आणि कसा कराल?
औरंगाबाद येथे ग्रॅज्युएट उमेदवारांना 30,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. आताच अर्ज करा
IRCTC मध्ये 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या
भारतीय रेल्वे ही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असलेली सरकारी संस्था आहे. रेल्वे आपल्या विविध उपक्रमांतर्गत रोजगारनिर्मिती करत आहे. यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना रोजगार उपलब्ध होतो. अनेक गरजू, कमी शिकलेले लोक याचा नेहमीच लाभ घेतात. यासाठीच इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन भरती प्रक्रियेची माहिती घ्यावी.
अर्जाची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 22
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा