चाळीसगाव,(प्रतिनिधी)- घरगुती ‘वाद’ विकोपाला गेल्याने थेट सासऱ्याने सुनेचा रुमालाने गळा, नाक व तोंड दाबून तिला जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील शिवशक्ती नगरात शुक्रवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी रात्री घडली.
सासरच्या जाचाला कंटाळून कविता ही माहेरी गेली होती. तिला मुलगा व सव्वा दोन महिन्यांची मुलगी आहे. दोन दिवसांपूर्वी कविता ही सासरी आली होती दरम्यान सासरे सुनेच्या झालेल्या वादात सासऱ्याने सुनेला जीवे ठार मारल्याने खळबळ उडाली.najarkaid.com
najarkaid.com चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील रहिवासी उत्तम पुंजाजी चौधरी यांचा मुलगा प्रा. गोकुळ उत्तम चौधरी यांचा विवाह शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील कविता यांच्याशी झाला होता. सून व सासरच्या लोकांचे कौटुंबिक वाद सुरू आहेत.
या घटनेनंतर मृत विवाहितेच्या नातलगांनी पोलीस स्टेशन najarkaid.com मध्ये गर्दी करत सासऱ्यास अटक करण्याची मागणी लावून धरली दरम्यान सासरा उत्तम पुंजाजी चौधरी हा स्वतःहून पोलिसात हजर झाला. याप्रकरणी पोलिसांनी सासऱ्यास भादंवि कलम ३०२ नुसार पोलिसांनी अटक केली आहे.