जळगाव,(प्रतिनिधी)- ‘त्या’ तिघांनी ट्रान्सपोर्टचे भाडे थकविले, पैसे मागितले तर धक्काबुक्की केली ; त्रासाला कंटाळून भागवत श्यामराव जाधव (४८, रा. आयोध्या नगर) या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी जळगाव शहरात घडली असून आत्महत्या करण्यापूर्वी ‘त्या’ तिघांची नावं चिट्ठीत लिहून ठेवली आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार भागवत जाधव यांचा अजिंठा चौकात भागवत ट्रान्सपोर्ट कोलकाता येथे पाठविलेल्या ट्रकचे राहिलेले भाडे देण्यास नकार देऊन धक्काबुक्की केल्याच्या कारणावरुन भागवत श्यामराव जाधव (४८, रा. आयोध्या नगर) या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात तिघांच्या नावाचा उल्लेख केला आहे. प्राथमिकस्तरावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार भागवत जाधव यांचा अजिंठा चौकात भागवत ट्रान्सपोर्ट नावाने व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी पत्नी सुनीता बाहेर गेलेल्या होत्या तर दोन्ही मुले कॉलेजला गेलेले होते. एक वाजता पत्नी घरी आली असता भागवत यांनी दोरीने गळफास घेतल्याचे दिसले.
ट्रान्सपोर्ट चे भाडे २६ हजार रुपये देण्यास नकार
भागवत जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात दिनेश माने, बापू पाटील आणि कंपनीचे मालक पाटील या तीन जणांची नावे लिहिली आहे. आठ दिवसांपूर्वी तिघांनी जाधव यांचा ट्रक कोलकाता येथे पाठविला. त्याचे ४५ हजार रुपये भाडे ठरले होते. त्यापैकी २६ हजार रुपये बाकी होते. डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने ट्रक जळगावात येऊ शकत नाही असे जाधव यांनी सांगितले असता तिघांनी रक्कम देण्यास नकार देत त्याच कारणावरुन धक्काबुक्की केली होती. सुसाईड नोटमध्ये देखील तसे नमूद केले आहे, तिघांच्या दबावातून वडिलांनी आत्महत्या केली आहे, असा आरोप जाधव यांचा मुलगा योगेश, तेजस यांनी केला आहे.