जयपूर : देशात महिलांसह मुलीवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रकार वाढतच चालले आहे. यामुळे महिलांसह मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच एक संतापजनक घटना समोर आलीय. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीवर आठ जणांनी मिळून संतापजनक कृत्य केलं.
या मुलीचा नराधमांनी अश्लिल व्हिडीओही बनवला होता. त्यानंतर त्यांनी या मुलीला व्हिडीओ सोशल मीडियावर टाकायची धमकी दिली आणि तिच्याकडून 50 हजार रुपयेही उकळले. विकृती तर याही पुढे होती. गँगरेप करणाऱ्यांनी 50 हजार रुपये घेतल्यानंतरही पीडितेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केलाच. धक्कादायक बाब हा व्हिडीओ पीडितेच्या घरातल्यांपर्यंत पोहोचला आणि तेही हादरले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
पीडितेनं दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, 9 महिन्यांआधी तिच्यावर गँगरेप करण्यात आला होता. 8 युवकांनी मिळून आपल्यासोबत घृणास्पद कृत्य केलं होतं. त्यांनी आधी माझे अश्लिल फोटो काढले. नंतर ते फोटो देण्याच्या बहाण्याने मला बोलावलं आणि माझ्यावर जबरदस्ती केली, असं पीडितेनं म्हटलंय.
यानंतर जबरदस्ती कपडे उतरवायला लावले आणि माझा एक व्हिडीओ बनवला, असाही आरोप करण्यात आलाय. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. पण यानंतरही नराधम थांबले नाही. दरम्यान, याबाबत पीडितेच्या वडिलांनी आणि भावाने आठ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पॉक्सो कायद्यातंर्गत आणि आयटी कायद्याच्या खाली आता पोलिसांनी याप्रकरणी आठ नराधमांविरोधात गुन्हा नोंदवून घेतला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.