नवी दिल्ली : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकवेळा काही व्हिडिओ पाहिल्यानंतरही आपण पुढे सरकतो, तर काही व्हिडिओ असे असतात की पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रपोज करणाऱ्या मुलाची चांगलीच फजिती झालीये.
हा व्हिडीओ बघा हा मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी सगळं प्लॅन करतो. निसर्गरम्य ठिकाणी आपल्या मनातलं बोलून दाखविण्याचा त्याचा हा प्लॅन फसलेला दिसतोय. मात्र गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसला आणि हातातील अंगठी धबधब्यात पडली.
लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फेलर्मी नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 1.5 लाखांहून अधिक म्हणजेच 15 लाख लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी त्याला लाईकही केले आहे. व्हिडिओवर येणाऱ्या कमेंट्सही या घटनेपेक्षा कमी विनोदी नाहीत. बरेच लोक म्हणाले – हे देवाचे लक्षण आहे, असे करू नका. काही लोक म्हणाले की मी उडी मारली असती, तर एका यूजरने गंमतीत म्हटले की लाखो वर्षांनी कोणालातरी अंगठी मिळेल.