जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी ५ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना काल दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी जळगाव जामनेर, चाळीसगाव, यावल,सावदा येथील पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आले आहे.
जळगाव शहर….
जळगाव शहरातील निमखेडी शिवरातील प्रज्ञा कॉलनीत राहणाऱ्या २६ वर्षीय काल्याणी विशाल सोनवणे या महिलेने झोक्याच्या दोरीस गळफास घेत आत्महत्या केली.जिल्हा कारागृहात रक्षक असलेल्या विशाल राजेंद्र सोनवणे यांची पत्नी कल्याणी विशाल सोनवणे (२७, रा. प्रज्ञा कॉलनी) यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. कल्याणी यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
प्राप्त माहितीनुसार, कल्याणी यांचे पती विशाल सोनवणे रात्रपाळी ड्युटीला होते. घरी कल्याणी.सासू, सासरे व दीड वर्षाची मुलगी होते. विशाल सोनवणे सकाळी साडेसात वाजता ड्युटीवरून घरी आले. पत्नी वरच्या मजल्यावरून अजून खाली का आली नाही म्हणून बघायला गेले असता कल्याणीने गळफास घेतला होता.
पोलीस डायरीतील नोंदी नुसार मयत नामे कल्याणी विशाल सोनवणे वय २६ रा. गट नं. ७७ प्लाट नं. ४९ प्रज्ञा कॉलनी निमखेडी शिवार जळगाव हीने तिचे राहत्या घरी घराच्या छताला असलेल्या कडीला झोका बांधलेला होता त्या झोक्याच्या दोरीस गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे ७९/२०२२ सीआरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंमलदार पो. उपनिरी श्री नयन छबुलाल पाटील नेम. जळगाव तालुका पोस्टे हे करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी सहा. पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंथा यांनी देखील भेट दिली होती.
जामनेर शहर …
जामनेर शहरातील भीमनगर येथील रहिवाशी रमेश बन्सी सपकाळे वय -७० यांनी गळफास घेतल्याने मृत्यू झाला या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे सी.एम.ओ. डॉ हर्षल चांदा यांनी खबर दिल्यानुसार जामनेर पोलीस स्टेशनं येथे ८८/२०२२ सीआरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबर नुसार मयत रमेश बन्सी सपकाळे यास त्याचे नातेवाईकांनी मृत अवस्थेतमध्ये दाखल केले असुन पुढील तजवीज होणेस विनंती आहे वगैरे मजकुर चे खबर वरून वर प्रमाणे अ.मू. रजि दाखल करण्यात आला आहे. पो.स्टे तपासी अंमलदार : पोना. योगेश महाजन नेम जामनेर पो स्टे हे आहेत.
चाळीसगाव शहर
चाळीसगाव टाकळी प्र. चा. येथील रहिवाशी विजय प्रकाश पवार वय -२२ या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली असून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या लेखी मेमो वरून शहर पोलीस स्टेशन येथे ७८/२०२२ सीआरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आहेवैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेल्या खबर नुसार मृत्युचे कारण राहते घरीगळफास घेतल्याने मयत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान मृताचे नातेवाईक अनिल जगन्नाथ पवार यांनी मयत अवस्थेत दाखल केले आहे. MLC मेमो आल्यावरुन सदर अकरमात मृत्यु रजिष्टरी दाखल करण्यात आला आहे. तपासी अंमलदार :- पोहेकॉ अजय सुक्राम मालचे चाळीसगाव शहर हे पुढील तपास करीत आहे.
यावल…
यावल तालुक्यातील दगडी येथील रहिवाशी जयदीप गुलाब पाटील वय -२१ या तरुणाने दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. मयत याने राहते घरी खोलीच्या सराला पन्नीची चंदेरी रंगाच्या दोरीने गळफास घेवून मयत झाला आहे..यावल पोलीस स्टेशन येथे ५९/२०२२ सीआरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंमलदार : पो.हे.कॉ. / ३२०१ सिकंदर तडवी नेम, यावलपो.स्टे. हे करीत आहेत.
सावदा….
रावेर तालुक्यातील वाघोदा बु. येथील रहिवाशी भीमराव कडू मराठे वय – ५२ यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे.मयत हा गळफास घेऊन मयत स्थितीत लटकलेला दिसला होता. दिलेल्या खबरीवरून सावदा पोलीस स्टेशन येथे १६/२०२२ सीआरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंमलदार संजीव एकनाथ चौधरी सावदा पो.स्टे हे करीत आहे.