युवा सेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ-पाटील यांना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या एका कथित समर्थकाने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी मुंबईच्या भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
आमदार संतोष बांगर समर्थकाने अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या.फोनवरील या संवादामध्ये नेमकं फोनवर काय बोलला हे अयोध्या पौळ यांनी सांगितले असून जुलै महिन्यापासून मला संतोष बांगर यांचे समर्थक आणि इतर लोकांकडून धमक्या येत असल्याचा आरोप अयोध्या यांनी केला आहे.
अयोध्या पौळ या युवा सेना सोशल मीडियाच्या राज्य समनव्यक आहेत. संतोष बांगर यांच्या समर्थकांनी फोन करून धमकावणे अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे कॉल रेकॉर्डींग उद्धव ठाकरें पर्यंत पोहोचली असून उद्धव ठाकरेंनी स्वत: फोन करुन मला धीर देत पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास सांगीतल्याचे अयोध्या म्हणाल्या. दरम्यान संजय बांगर यांचे दोन समर्थक आणि तीन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात धमकीचा गुन्हा दाखल झाला आहे.