जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरीही मला संपू शकत नाहीत जर मी तुमच्या मनात असेल तर, असं पंकजा मुंडे यांनी थेट पंतप्रधान मोदींना आव्हान दिल आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही आश्चर्य व्यक्त केलं.
एरवी भाजपवर सडकून टीका करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी नरेंद्र मोदी यांची ताकद पंकजा मुंडेंपेक्षा कितीतरी जास्त असल्याची जाणीव त्यांना करुन दिली आहे. त्यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे या मोदींना आव्हान देऊ शकत नाहीत, असे म्हटले.
पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव कोणत्या अर्थाने घेतले हे माहिती नाही. मला कुणीही पराभूत करू शकत नाही, अशी पंकजा मुंडेंची भावना असेल तर ते दुर्दैवी आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची भाषा करणे, हेदेखील अयोग्य आहे. पंकजा मुंडे या पंतप्रधान मोदी यांना आव्हान देऊ शकत नाहीत.
हे पण वाचा :
खुशखबर… शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3000 रुपये, कोण असेल पात्र? जाणून घ्या
शेवटच्या चॅटमध्ये दडले अंकिताच्या खुनाचे रहस्य, वाचा संपूर्ण चॅट
मला वाटतं, पंकजा मुंडे यांच्या विधानाचा तसा अर्थही काढला जाऊ नये. पंकजा मुंडे या भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आजवर भाजप आणि पंतप्रधान मोदींविषयी अनेकदा नाराजी व्यक्त केली असली तरी त्या पक्षाचे काम एकनिष्ठपणे करतात, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले.