जळगाव (प्रतिनिधी)- पेट्रोल पंपाच्या झोनल मशिन स्टॅपींग करुन प्रमाणपत्र देण्याच्या मोबदलयात ३२ हजार रुपयांची लाच मागणारा वैद्यमापन निरीक्षकास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून लाचखोर निरीक्षकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुनिल रामदास खैरनार (५६) असे आहे ते रावेर येथे कार्यरत असलेल्या वैद्यमापन शास्त्र विभागात निरीक्षक आहेत.
एसीबी पथकाने रंगेहात पकडले….
तक्रारदार यांचा रावेर येथील एस.एस. बिंबे ॲण्ड सन्स हा पेट्रोलपंप अकरा महीन्याच्या कराराने भाडेतत्वावर चालवण्यास घेतला आहे. या पेट्रोलपंपाच्या चार झोनल मशीन स्टॅम्पिंग करुन त्याबाबतचे स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदाराकडे सुनिल खैरनार यांनी ३२ हजार रुपयांची लाच मागीतली होती. ३२ हजार रुपयांची लाच पेट्रोल पंपाच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागी घेतांना त्यांना एसीबी पथकाने रंगेहात पकडले.
एसीबीचे डीवायएसपी शशिकांत एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहीरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना. किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना. सुनिल वानखेडे, पो. कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. सचिन चाटे, पो.कॉ. प्रणेश ठाकुरपो.कॉ. ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ,, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी आदींच्या पथकाने कारवाई केली.